ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय व संवेदनशील माहिती लीक झाल्याने एकच खळबळ माजली आहे. फ्रान्समधील 'डीसीएनएस' या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. चिंतेची बाब म्हणजे, त्या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दल गुप्त माहितीचा समावेश असल्याचे समजते. याप्रकरणी नौदलाने निवेदन जारी केले असून ही गुप्त माहिती भारतातून नव्हे तर परदेशाून लीक झाल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले आहे अशी माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ' डीसीएनएस' या कंपनीला एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियासाठी १२ पाणबुड्यांच्या डिझायनिंगचे कंत्राट मिळाले होते. त्यामध्ये पाणबुडीचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, टॉर्पेडो (पाणतीर) प्रक्षेपण प्रणाली तसेच पाणबुडीतील संपर्क व दिशादर्शन प्रणाली याचा समावेश आहे.
दरम्यान भारतीय नौदलातील 'स्कॉर्पिअन' प्रकारातील 'कलावरी' या पहिल्या पाणबुडीची मे २०१६ मध्ये समुद्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली व ती लौकरच नौदलात दाखल होणार आहे. त्याशिवाय येत्या २० वर्षांत, अशाच प्रकारच्या ६ 'स्कॉर्पिअन' पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असल्याचे समजते.
स्कॉर्पिअन पाणबुडीची नेमकी कोणती माहिती उघड झाली आहे याची माहिती नौदल प्रमुखांना घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री 12 वाजता मला याची माहिती मिळाली होती, याप्रकरणी पूर्ण 100 टक्के माहिती लीक झालेली नाही. मात्र आपल्याशी (भारतीय नौदलाशी) संबंधित किती माहिती उघड झाली आहे हे प्रथम पाहावं लागेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
It appears that the source of leak is from overseas and not in India: Navy statement on Scorpene submarine project leak— ANI (@ANI_news) August 24, 2016
Navy Chief has been asked to analyze as to what exactly has been leaked- Manohar Parrikar on Scorpene submarine project leak— ANI (@ANI_news) August 24, 2016
First step is to identify if its related to us, and anyway its not all 100% leak: Manohar Parrikar on submarine leak pic.twitter.com/6FG8M09HZv— ANI (@ANI_news) August 24, 2016