शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गोपनीय माहितीला प्रसिद्धी नाही!

By admin | Published: August 31, 2016 4:14 AM

भारतीय नौदल वापरत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुड्यांशी संबंधित आणखी गोपनीय माहिती प्रसिद्ध करणार नाही, असे ‘द आॅस्ट्रेलियन’ या दैनिकाने मंगळवारी म्हटले

मेलबोर्न : भारतीय नौदल वापरत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुड्यांशी संबंधित आणखी गोपनीय माहिती प्रसिद्ध करणार नाही, असे ‘द आॅस्ट्रेलियन’ या दैनिकाने मंगळवारी म्हटले. न्यू साऊथ वेल्स सर्वोच्च न्यायालयाने या दैनिकाला अशी माहिती प्रसिद्ध करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. या न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशात दैनिकाने संकेतस्थळावरून दस्तावेज काढून टाकावा, असे म्हटले. ‘द आॅस्ट्रेलियन’ने याआधीच संकेतस्थळावरून सुरक्षेशी संबंधित संवेदनशील असा मजकूर प्रकाशित केलेला आहे. संरक्षणाशी संबंधित सेवा देणाऱ्या डीसीएनएस या फ्रेंच कंपनीला स्कॉर्पिनशी संबंधित दस्तावेज बुधवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत परत करण्यासही न्यायालयाने सांगितले. ‘द आॅस्ट्रेलियन’ने संवेदनशील मजकूर प्रसिद्ध करू नये अशी मागणी डीसीएनएसने शपथपत्राद्वारे न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. ‘द आॅस्ट्रेलियन’ला स्कॉर्पिनची फुटलेली गोपनीय माहिती प्रसिद्ध न करण्याच्या आदेशाची मुदत एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपते. त्यानंतर गुरुवारीच या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होईल. डीसीएनएसने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे की, दस्तावेज उघड झाल्यामुळे आमच्या स्पर्धकांना तो उपलब्ध झाल्यामुळे आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. अत्यंत गोपनीय माहिती फुटल्यामुळे डीसीएनएस कंपनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा गेला. (वृत्तसंस्था)