संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट घ्यायच्या आधीच कोणत्या गाडीचे तिकीट मिळेल व कोणत्या गाडीचे तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंग तिकीट मिळेल याची माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे.विमान प्रवासाच्या तिकिटाच्या धर्तीवर रेल्वेदेखील आपली बेवसाइट सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तिकिटांच्या माहितीच्या आधारे तुम्हाला कोणत्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म असेल किंवा कोणत्या रेल्वेतून तुम्हाला कमी खर्चात प्रवास करता येईल याची माहिती घेता येईल. या सुविधा नव्या वर्षाच्या सुरवातीपासून उपलब्ध व्हाव्यात अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.गोयल सध्या मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याआधी त्यांनी सगळे विभागीय महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. तीत त्यांनी वेबसाइट सुरू करण्याचे आदेश दिले होते. गोयल म्हणाले की विमान कंपन्यांसाठी अशी वेबसाइट बनू शकते तर रेल्वेसाठी का नाही? रेल्वेचे अधिकारी त्यांच्याकडील माहितीच्या आधाराने त्या प्रकारची सोय का देऊ शकत नाहीत? बेवसाईटला उशीर झाल्याबद्दल त्यांनी अधिकाºयांना खडसावले.रेल्वे गेल्या पाच वर्षांच्या माहितीचे विश्लेषण या बेवसाइटसाठी करील. कोणत्या महिन्यात कोणत्या रेल्वेला प्रचंड गर्दी असते व कोणत्या वेळी कोणत्या रेल्वेला फार मागणी नसते याची माहिती ते घेतील. कोणत्या वेळेला कोणत्या रेल्वेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होते व कोणत्या रेल्वे गाड्यांत किती तिकिटे कन्फर्म होत नाहीत या आधारे प्रवाशांना कोणत्या रेल्वेचे तिकीट कधी घ्यायचे याची माहिती या वेबसाइटवरून समजेल.कोणत्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म होण्याची जास्त शक्यता आहे किंवा कोणत्या रेल्वेत त्यांना कोणत्या हंगामात कमी खर्चात तिकीट मिळू शकेल ही माहिती घेता येईल. रेल्वे मंत्रालय आपली संस्था क्रिससह इतर खासगी संस्थांशीही या वेबसाईटबाबत चर्चा करीत आहे.भाडे परत मिळेल : रेल्वेची संस्था आयआरसीटीसीवर भीम अॅप किंवा युपीआयवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना लकी ड्रॉमध्ये सहभागी करून घेतले जाईल. त्याच्या आधारे दरमहा पाच प्रवाशांना लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांचे पूर्ण भाडे परत केले जाईल. ही योजना सध्या सहा महिन्यांसाठी आहे. गोयल यांच्या आदेशावरून या योजनेसाठी एका प्रवाशाला एका महिन्यात फक्त एक पीआरआर नंबरवर पुरस्कार मिळेल. प्रवाशाला त्याचे भाडे त्याचे भीम अॅप वा यूपीआय नंबरवरच परत मिळेल.
रेल्वेच्या तिकीट बुकिंगआधीच कन्फर्मेशनची मिळणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:13 AM