शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:58 AM

सीएएला पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला.

बंगळुरू : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याला (सीएए) पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला. महाविद्यालय परिसराबाहेर कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तानात परत जा’ अशा घोषणा दिल्या, तर आमच्या संस्थेच्या भिंतीवर सीएएला पाठिंबा असलेले भित्तीपत्रक चिकटवण्यास विद्यार्थिनींनी विरोध केला.या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत होता. भाजपचे स्थानिक नेते एम.एम. गोविंदराज यांचे समर्थक व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गटाने ‘भारताचा सीएएला पाठिंबा’ असा मजकूर असलेले भित्तीपत्रक महाविद्यालयाच्या भिंतीवर चिकटवले होते. असे भित्तीपत्रक आम्ही महाविद्यालयाच्या भिंतीवर लावू देणार नाही, असे म्हणून या भित्तीपत्रकाला विद्यार्थिनींनी विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा त्यांना आरडाओरड करून गप्प बसवले. ‘तुम्हाला नागरिकत्वाबद्दल काळजी नाही, तर तुम्हाला फक्त तुमचीच काळजी आहे.आधी तुम्ही भारताची काळजी केली पाहिजे,’ असे भाजपचा कार्यकर्ता मुलींवर ओरडताना त्या व्हिडिओमध्ये ऐकू आले. सीएएला विरोध करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही ठोस कारणे व सीएएवर वादविवाद किंवा युक्तिवाद करण्याची तुमची इच्छा आहे का, असे कार्यकर्त्यांनी विचारले.बीटीएम लेआऊटचे काँग्रेसचे आमदार रामलिंग रेड्डी यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी गुरुवारी महाविद्यालयाला भेट दिली व नंतर ते त्याच्या व्यवस्थापनाशी बोललेदेखील. नंतर वार्ताहरांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, ‘महाविद्यालयाचा परिसर कोणत्याही राजकीय उपक्रमांसाठी वापरला जाऊ नये.’>तुम्हा मुलींना सीएए का खटकतो आहे?कार्यकर्त्यांनी या मुलींना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही या महाविद्यालयात फक्त विद्यार्थिनी आहात, त्याच्या मालक नाही. तुम्हा मुलींना सीएए का खटकतो आहे? तुम्ही या महाविद्यालयाच्या मालक आहात का? असा प्रश्न त्यांनी विचारला. यातून जोरदार वादावादी झाली.नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला सीएए हवा आहे’ आणि ‘पाकिस्तानात परत जा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्याचे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक