स्थानिकांचा संभ्रम मिटेना
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना
स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेनापेडणे : पेडणे तालुक्यातील प्रस्तावित मोपा आंतराष्टीय विमानतळ राजकीय हस्तक्षेपामुळे गाजत आहे. मोपा विमानतळाच्या बाजूने आणि विरोधात असे दोन मतप्रवाह गोव्यात आहेत. शिवाय या प्रकल्पांमुळे गोव्याला खराच लाभ होणार आहे का? अशी शंका आहे. तसेच प्रकल्पामुळे पर्यावरण हानीकडे बोट दाखविणारेही विरोधक आहेत. पुर्वंजानी राखून ठेवलेल्या जमनीवर आपला उदारनिर्वाह चालतो. ही जागा पुढच्या पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, ही जागा सरकारने संपादीत करून तोंडाचा घास हिरवल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांकडून मिळत आहे. शेतकरी सीताराम परब यांनी सांगितले, एकाच सर्व्हेतील ७० जणांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. पावसाळ्यात उगवणारा वर्षभरचा चारा विकला तरी सरकारने दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जास्त पैशे मिळतात. त्यामुळे सरकारने योग्य मोबदला द्यावा असे त्यांनी पुढे सांगितले. कॉग्रेस सरकारने शेतकर्यांना विश्वासात न घेताच जमिनीना कवडीमोल दर दिला. त्याचा फटका विधानसभा निवडणूकीत पक्षाला बसला. त्यामुळे भाजप सरकारने शेतकर्यांना किमान ६०० रूपये प्रतिचौरस मीटर दर द्यावा अशी मागणी माजी जिल्हापंचायत अध्यक्ष पांडुरंग परब यांनी केली आहे. पेडणे तालुक्यातील मोपा, वारखंड, चांदेल, कासारवर्णे, उगवे, अमेरे या भागातील जमिनी विमानतळासाठी गेल्या आहेत. मोपा, सडा व कासरवर्णे सड्यावर एकूण १३ धनगरांची घरे आहेत. ही घरे विमानतळामुळे स्थलांतरित करावी लागणार आहेत. सरकराने आपल्याला विश्वासात घेतले नाही. तसेच घर स्थलांतरबाबत आम्हाला कोणतकल्पनाही देण्यात आलेली नाही. सरकारचा एकहीअधिकारी जनसुनावणीनंतर आपल्या वस्तीत फिरकला नसल्याचे धनगर समाजाचे मत आहे. नियोजित मोपा विमानतळामुळे येथील धनगर कंुटुबीयांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. धनगर समाजाने आपल्याला कासारवर्णे सड्यावर एकाच ठिकाणी जागा देण्यात यावी. अशी मागणी जोर धरत आहे. सडा येथील घरे देवस्थान, देशप्रभू, परब, कांबली, फौजदार यांच्या मालकिची आहेत. पूर्वजापांसून आमची लोकवस्ती आहे. परंतु सरकराने वीज, पाणी पुरविली नाही. वीज नसल्याने रात्रीच्या वेळी गॅस, मेणबत्ती, पेटेल दिव्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे कामे लवकर उरकावी लागतात. या फस्तीत अजूनही मातीच्या घरोघरी चुली आहेत. असे धनगर समाजातील नमिशा वरळ यांनी सांगितले. पाण्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी ३ ि़कमी पायी चालत जावे लागते. या समाजातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही. त्यासाठी मुलांना ३ कि.मी पायी शाळेला जावे लागते. असे वरक पुढे म्हणाल्या. धनगर समाजातील लोकांना विमानाचे कुतूहल असले करीही घर संसाराची चिंता जास्त आहे. घरावर बुलडोझर फिरवून घरांचे कुठल्या कुठे स्थलांतर करतील अशी भिती त्यांना वाटत आहे. समाजातील सगळ्या लोकांची घरे एकाच ठिकाणी स्थलांतरीत करावी. तसेच वीज, पाणी, रस्ता व योग्य मोबदला देण्यात यावा. विमानतळाला विरोध नाही. परंतु सरकराने पुढच्या पिढीचा विचार करावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिध)फोटो ओळी : मोपा सड्यावरील धनगरांची घरे, मुले पायी चालत शाळेत जाताना व काडूच्या बागायती. (छाया : निवृत्ती शिरोडकर)....................