लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ब्रिटनहून आलेल्या हवाई प्रवाशांनी कोविडविषयक नव्या जाचक नियमांमुळे दिल्ली विमानतळावर गोंधळ घातला. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३४ सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
शेवटच्या क्षणी कोविड विषयक नियमांत बदल करण्यात आल्याबद्दल प्रवासी असंतोष व्यक्त करताना व्हिडिओत दिसत आहेत. नव्या नियमामुळे २५० प्रवासी विमानतळावर खोळंबल्याचे दिसत आहे. दिल्ली सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, ब्रिटनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीस सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. निगेटिव्ह असलेल्यांनाही ७ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीचा तसेच अहवाल येईपर्यंचा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे.
चाचणीत सहभागी स्वयंसेवकाचा मृत्यूभाेपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भाेपाळमध्ये भारत बायाेटेकच्या ‘काेव्हॅक्सिन’ या लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक मरावी याने १२ डिसेंबरला लसीचा पहिला डाेस देण्यात आला हाेता. त्यानंतर २१ डिसेंबरला प्रकृती खालावल्याने त्यांचा अचानक मृत्यू झाला. दीपक यांच्या कुटुंबीयांनी लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर, दीपक यांचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्याचा संशय आहे.