शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जीएसटीसाठी पुन्हा काँग्रेसची मनधरणी

By admin | Published: January 08, 2016 3:21 AM

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वस्तू व सेवा कर विधेयकासह (जीएसटी) अन्य महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सरकारने पुन्हा एकदा काँगे्रसच्या मनधरणीचे प्रयत्न

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीआगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वस्तू व सेवा कर विधेयकासह (जीएसटी) अन्य महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सरकारने पुन्हा एकदा काँगे्रसच्या मनधरणीचे प्रयत्न चालवले आहेत. याच प्रयत्नाअंतर्गत संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली.जीएसटी विधेयकासंदर्भात काँग्रेसने आपली अंतिम भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह १0, जनपथ येथे जवळपास २0 मिनिटे चाललेल्या या भेटीत सरकारतर्फे नायडूंनी सोनियांकडे धरला. काँग्रेसकडून सकारात्मक संकेत प्राप्त झाले तर अर्थसंकल्पीय अधिवेशन थोडे लवकर सुरू करण्याचीही सरकारची तयारी आहे, असेही त्यांनी यावेळी सुचवले. सरकारच्या प्रस्तावाचे उत्तर देताना सोनिया म्हणाल्या, पक्षातल्या अन्य नेत्यांशी चर्चा करून या विषयावर काँग्रेस लवकरच आपली भूमिका सरकारला कळवील. ही माहिती स्वत: नायडूंनीच या भेटीनंतर पत्रकारांना दिली.राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्याने प्रस्तुत विधेयक संसदेच्या मंजुरीसाठी रखडले आहे. काँग्रेसने या विधेयकाबाबत सरकारला मुख्यत्वे ३ दुरुस्त्या सुचवल्या आहेत. वस्तू आणि सेवाकराच्या दराची कमाल मर्यादा निश्चित करतानाच त्यात कोणताही बदल घटना दुरुस्तीनेच केला जावा, उत्पादन करणाऱ्या राज्यांना वस्तू आणि सेवाकरावर १ टक्का अधिभार लावण्याची मुभा देणारी तरतूद रद्द करण्यात यावी आणि करआकारणी संबंधी वाद निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एका लवाद मंडळाची स्थापना करण्यात यावी अशी या पक्षाची मागणी आहे. या मागण्यांचा खुलासा करताना नायडू म्हणाले, काँग्रेसने सुचवलेल्या तीनही मुद्यांवर तोडगा काढण्यात अर्थमंत्री जेटलींना यश आले आहे.