नवी दिल्ली : दाढी, मिशा काढून ‘स्मार्ट’बनण्याचे प्रमाण हल्ली वाढले होते. ‘अशी ही कशी नाहीशी झाली मिशी?’ असा प्रश्न पडला होता. मात्र, पाकिस्तानी विमानाला हुसकावून लावणारे शूर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी, दाढी ठेवण्याची धूम दिल्लीसह देशभरात तरुणांपासून उद्योगपतींपर्यंत उसळली आहे.‘सोशल मीडिया’तून अभिनंदन यांची छबी एका ‘सुपर ब्रँड’च्या रूपाने पुढे आली आहे. दोन दिवसांपासून त्यांच्याप्रमाणे मिशी कोरण्याचा उत्साह युवकांमध्ये विशेष करून आहे. नेते, अभिनेते आणि माजी सैनिकांनाही अशा मिशीच्या ‘स्टाइल’चे चाहते आहेत. पाकच्या तावडीतून ऐटबाजपणे भारतात परतलेल्या अभिनंदन यांच्या धाडसाबरोबरच मिश्यांचेही कौतुक होत आहे. अनेक युवक अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशा कोरून घेत असून, सोशल मीडियावर आपली प्रतिमा ‘व्हायरल’करताना दिसतात.>अभिनंदन बनले ब्रँड‘ब्रँड’तज्ज्ञ रमेश तहिलियानीयांनी सांगितले की, अभिनंदनएक ‘ब्रँड’बनले आहेत. त्यांच्याशी संबंधित घटनेने त्यांना ‘सुपर ब्रँड’ बनविले आहे. ‘बीअर्ड स्टाइल’या संकेतस्थळावरही मिशीचे कौतुक होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ‘टिष्ट्वट’ करून वर्धमान यांचे डिजिटल स्केच’ सादर केले आहे. त्यात केवळ त्यांची दाढी, मिशीच दिसत आहे.
अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 6:18 AM