आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 04:03 PM2021-03-01T16:03:38+5:302021-03-01T16:10:30+5:30
प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेखील केला. (Congres General Secretary Priyanka Gandhi)
गुवाहाटी - देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडमुकीची घोषणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आसाममध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) सध्या दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी गुवाहाटीत येथे कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तर लखीमपूर येथे आदीवासी झूमर डान्सदेखील ('Jhumur' dance) केला. (Congres General Secretary Priyanka Gandhi Vadra in assam launch poll campaign and joins in the 'Jhumur' dance)
प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेखील केला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे. जान्स दरम्यान गोल-गोल फिरत प्रियांकांनी डान्स केला. यावेळी स्थानिक लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रियांका गांधी या आसामसह, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या आणि पुद्दुचेरी या केंद्र शातित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक असतील.
Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले
#WATCH Assam: Congres General Secretary Priyanka Gandhi Vadra joins in the 'Jhumur' dance of performers from tea tribes, in Lakhimpur. pic.twitter.com/zAbDkSI6KU
— ANI (@ANI) March 1, 2021
दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधी येथे अनेक कार्यक्रमांत भाग घेतील. यावेळी त्या तेजपूरमधील एका रॅलिलाही संबोधित करणार आहेत. तरुणांनांच्या रोजागाराच्या मुद्द्यावर आगामी काळात काँग्रेसच्या वतीने आसाममध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. येथील सरकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल.
...म्हणून भारताच्या या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक, आता 105 जोडप्यांनी घेतले 'सात फेरे'
आसाममध्ये विधानसभा निवडणूक -
- पहिला टप्पा - २७ मार्च मतदान
- दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान
- तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान
तामिळनाडूत राहुल गांधींनी मारले पुशअप्स -
काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, राहुल गांधींनी सोमवारी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला, पण त्यानंतर राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले, कन्याकुमारीत राहुल गांधींनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला, त्यावेळी राहुल गांधी एका युवतीसोबत पुशअप करताना दिसून आले.