Congress News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होते. दरम्यान, गेल्या 9 वर्षात जवळपास 23 बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास हायकमांडला जबाबदार धरले आहे. यात त्यांचा रोख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर होता.
कोणत्या नेत्याने कधी पक्ष सोडला?1. जगदंबिका पाल- 2014
2. चौधरी बिरेंदर सिंग- ऑगस्ट 2014
3. अजित जोगी- 2015
4. हिमंता बिस्वा सरमा- 2015
5. गिरीधर गमंग- 2015
6. एसएम कृष्णा- 2017
7. शंकर सिंह वाघेला- 2017
8. एनडी तिवारी- 2017
9. विजय बहुगुणा- 2016
10. रिटा बहुगुणा जोशी- 2016
11. अशोक चौधरी- 2018
12. नारायण राणे- 2016
14. अल्पेश ठाकोर- 2018
15. राधाकृष्ण विखे पाटील- 2019
16. टॉम वडाक्कन- 2019
17. सतपाल महाराज- 2014
18. अमरिंदर सिंग- 2022
19. जितिन प्रसाद- 2021
20. ज्योतिरादित्य सिंधिया- 2019
21. आरपीएन सिंह- 2022
22. कपिल सिब्बल- 2020
23. गुलाम नबी आझाद- 2022
या 23 नेत्यांशिवाय इतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे. सातत्याने नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील हायकमांडवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये पक्षाने याबाबत चर्चा केली होती, मात्र या चर्चेनंतरही अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले होते.