दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:37 PM2024-06-28T12:37:56+5:302024-06-28T12:39:29+5:30

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे टर्मिनलचे छत कोसळले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

Congress accused BJP over Delhi airport accident BJP responded | दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,"२००९ मध्ये..."

कालपासून दिल्लीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनलचा छत कोसळून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दुर्घटनेसाठी भ्रष्टाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.  कोसळलेला भाग २००९ मध्ये बांधला  असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

IGI विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली विमानतळ, जबलपूर विमानतळावरील गळती, अयोध्येतील पाणी साचणे, राममंदिरातील गळती ते गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत बोलताना म्हणाले की, हे सर्व मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत.

खरगे म्हणाले,'ही काही उदाहरणे मोदीजींचे मोठे दावे आणि भाजपचे 'जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा' उघड करत आहेत. १० मार्च रोजी दिल्ली विमानतळावर T1 चे उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'दुसऱ्या मातीतील माणूस' म्हटले होते. या सगळ्या खोट्या टाळ्या आणि भाषणबाजी निवडणुकीपूर्वी रिबन कापण्यासाठीच करण्यात आली, असा टोलाही मल्लिकार्जुन यांनी लगावला. पीडितांवर बोलताना खरगे म्हणाले की, त्यांना भ्रष्ट, अक्षम आणि स्वार्थी सरकारचा फटका बसला आहे.

अपघातानंतर आयजीआय विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. "सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख आणि जखमींना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तपास अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, कोणाचाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही मंत्री म्हणाले.

भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या टीकेवर बोलताना केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, पडलेल्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलेले नाही, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले ते दुसऱ्या बाजूचे आहे, ते वेगळे आहे. जो आज पडला आहे तो २००९ मध्ये बांधला होता. २००४ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीची सत्ता होती, असंही ते म्हणाले. 

Web Title: Congress accused BJP over Delhi airport accident BJP responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.