Congress on Mamata Banerjee: “ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवू शकत नाही”; ‘त्या’ आवाहनावरुन काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:55 AM2022-03-30T08:55:04+5:302022-03-30T08:56:13+5:30

Congress on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी सर्व गैरभाजपशासित मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहित एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे.

congress adhir ranjan chowdhury said not trust on tmc mamata banerjee over appeal of united opposition | Congress on Mamata Banerjee: “ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवू शकत नाही”; ‘त्या’ आवाहनावरुन काँग्रेसचा पलटवार

Congress on Mamata Banerjee: “ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवू शकत नाही”; ‘त्या’ आवाहनावरुन काँग्रेसचा पलटवार

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात विरोधक नेहमीच सरसावलेले दिसतात. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा ठपका विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यावर काँग्रेसने प्रतिक्रिया देताना, ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे सांगत टीका केली आहे. 

काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. कधी ममता बॅनर्जी म्हणतात की, सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र यावे. कधी त्या म्हणतात की, भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात एकजूट दाखवा, तर कधी काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, असे विधान त्या करतात. ममता बॅनर्जींचे विधान दिवसेंदिवस बदलत असते. त्याच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा हे समजत नाही, असा खोचक टोला अधिर रंजन चौधरी यांनी लगावला. 

भाजपविरोधात आघाडीचे ममतांचे पुन्हा प्रयत्न

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, भाजपविरोधात नवी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न ममतांनी सुरू केले आहेत. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून, भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या लढ्याची रणनीती ठरविण्यासाठी ममतांनी बैठकही बोलाविली आहे. मार्च महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ममतांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले. मनी लाँड्रिंग आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, वैयक्तिक कारण देऊन त्यांनी हजर राहण्यास असमर्थ असल्याचे ईडीला कळविल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: congress adhir ranjan chowdhury said not trust on tmc mamata banerjee over appeal of united opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.