नवी दिल्ली : सीबीएसईचे पेपर लीक झाल्याच्या प्रकरणात केंद्र सरकार व बोर्ड यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दिल्लीच्या अनेक भागांत शुक्रवारी विद्यार्थी संघटना, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आंदोलने केली. दोषींविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलने पाहता मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कुशक रोडवरील निवासस्थानीसुरक्षा व्यवस्था वाढविण्यातआली असून, तिथे जमावबंदीचे१४४ कलम लागू करण्यात आलेआहे.हजारो विद्यार्थी आजही संसद मार्गावरील भागात जमले. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या संघटनांनी प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रोखण्यातआले.दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीने सीबीएसई मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. एनएसयूआयचे नेते नीरज मिश्रा म्हणाले की, पेपर फुटीच्या प्रकरणातील माफियांचा या संस्थावर कसा ताबा आहे हे पेपर लीकमुळे समोर आले आहे. जावडेकर व सीबीएसई अध्यक्ष अनिता करवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.पेपर लीक प्रकरणानंतर प्रश्नपत्रिकांचे तीन सेट न पाठविता केंद्रांवर एकच प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यामुळे पेपर लीक करणे सोपे झाले. सीबीएसईच्या माजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रोटोकॉलचेपालन न केल्याने पेपर लीक झाले. जावडेकर यांनी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत. असे सांगितले जात आहे की, सामान्यपणे पेपरचे तीन सेट असतात. एक दिल्लीत तर दुसरा भारताच्या उर्वरित भागात आणि तिसरा सेट देशाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी असतो. पण यंदा एकच सेट असल्याने पेपर फोडणे सोपे झाले. प्रश्नपत्रिका तयार करणारी समिती डिसेंबर - जानेवारीत अभ्यासक्रम तपासून प्रश्नपत्रिकेचे काही सेट तयार करते. या वर्षी तीनऐवजी एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली.
कॉँग्रेसचे पेपरफुटीविरुद्ध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 5:08 AM