शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

काँग्रेस, अकाली दल ‘आप’मुळे ‘झाडू’न साफ; लोकांना बदल हवा होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 10:07 IST

काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंजाबमधील निवडणूक प्रचाराचे गरमागरम वातावरण कडाक्याच्या थंडीमध्ये अनुभवताना जे दिसत होते तेच निकालात समोर आल्याचे सिद्ध झाले. लोकांना बदल हवा होता आणि तो त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये शोधला. 

काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे. काँग्रेस अन्‌ अकाली दल आलटूनपालटून सत्तेत येतात आिण एकमेकांच्या पापांवर पांघरूण घालतात, अशी आम भावना होती.  दोघे एकमेकांना वाचवतात आणि आपल्या मतांचा वापर करून वर्षानुवर्षे सत्तेची गोड गोड फळे चाखतात हे ओळखलेल्या मतदारांनी ‘आप’ला साथ दिली.

कोट्यधीश ड्रग माफिया, वाळू माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया यांच्याविरोधात आपण एकेकटे लढू शकत नाही, ही असहायता मतदारांना ‘आप’च्या दारात घेऊन गेली एकमेकांशी ताळमेळ नसलेल्या नेत्यांमुळे काँग्रेसला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. भांडखोर नेते सत्तेच्या मस्तीत राहिले आणि त्यांची सामान्य माणसांशी नाळ तुटत गेली. एकूणच पक्षातच आम आदमी असलेल्या ‘आप’ने प्रस्थापितांना प्रचंड हादरे देऊन सत्तांतर घडवून आणले.

‘प्रामाणिक बंदा’तरुण पिढीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गारुड असल्याचे जागोजागी दिसत होते. केजरीवाल पंजाबमधील भ्रष्टाचार मिटवतील, असा विश्वास लोकांना होता. केजरीवालांच्या अनेक साहसी निर्णयांचे अप्रूप पंजाबी जनतेच्या मनात होते. ते त्यांनी ‘आप’ला पसंती देण्यासाठी ईव्हीएममध्ये उतरविले.बादलांच्या घराणेशाहीला धुडकावलेबादलांच्या घराणेशाहीला मतदारांनी पार धुडकावले. कृषी कायद्यांमुळे पंजाबात अप्रिय ठरल्याचा भाजपला फटका बसला. अकाली दलाच्या पदराखालून निघून भाजपने राज्यभरात निवडणूक लढविली. मात्र, त्यांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही.

 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआपcongressकाँग्रेस