- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत बंदवरून भाजपकडून काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर केल्या जात असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आकडे मांडून हे सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे की, मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांकडून जे युक्तिवाद केले जात आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत.काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीएसटीच्या यादीत करण्याची मागणी करून हा निर्णय होत नाही तोपर्यंत काँग्रेस आणि विरोधकांचे आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले. काँग्रेसने याला ११ लाख कोटींची कर लूट म्हटलेअसून, मोदी सरकारने केंद्रीयअबकारी कर १२ वेळा वाढवला. याशिवाय कस्टम ड्यूटी वेगळी. हे सगळे मिळून ११ लाख ४ हजार ७२ कोटी रुपयांची लूट सरकार कराच्या नावाने करून बसले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी एक तक्ता सादर करून आकडेवारी दिली.
सरकारने कराच्या नावाने ११ लाख कोटी रुपये लुटल्याचा काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:00 AM