नवी दिल्ली - काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर पदाचा दुरुपयोग आणि संशयास्पद व्यवसाय करार केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी शनिवारी (28 एप्रिल) पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ''मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व कॅबिनेट मंत्री व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची माहिती 48 तासांमध्ये देण्यास सांगितली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली मात्र यातील महत्त्वपूर्ण तथ्यं लपवून ठेवली. व्यावसायिक संबंध त्यांनी सार्वजनिक केलेले नाहीत'', असा आरोप पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पवन खेडा यांनी असेही सांगितले की, पीयूष गोयल यांना ऊर्जामंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर विवादाची परिस्थिती निर्माण झाली होती. जेथे त्यांनी संशयास्पद व्यावसायिक करार केले होते.
पीयूष गोयल यांच्याकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग, PMOलाही दिली नाही 'ही' माहिती - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 7:05 PM