काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:39 AM2024-03-28T11:39:52+5:302024-03-28T11:40:07+5:30
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. यादीद्वारे ४ राज्यांतील १४ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यनिहाय उमेदवार
झारखंड : कालिचरण मुंडा(खुंटी), सुखदेव भगत(लोहरदगा), जय प्रकाशभाई पटेल(हजारीबाग),
मध्य प्रदेश : राव यादवेंद्र सिंग(गुना), तरवार सिंह लोधी(दमोह), प्रताप भानू शर्मा(विदिशा),
तेलंगणा : डॉ. सुगुणा कुमारी चेलिमाला(आदिलाबाद), टी. जीवन रेड्डी(निझामाबाद), नीलम मधू (मेदक), चामला किरण कुमार रेड्डी(भोंगीर)
उत्तर प्रदेश : डॉली शर्मा(गाझियाबाद), शिवराम वाल्मिकी(बुलंदशहर), नकुल दुबे (सीतापूर), वीरेंद्र चौधरी(महाराजगंज)