काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील 12 उमेदवार जाहीर, कमलनाथ यांच्या पुत्राला छिंदावाडा येथून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:36 IST2019-04-04T16:16:24+5:302019-04-04T16:36:44+5:30
नुकत्याच आटोपलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील 12 उमेदवार जाहीर, कमलनाथ यांच्या पुत्राला छिंदावाडा येथून उमेदवारी
ठळक मुद्देCongress
नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमधील 12 उमेदवारांची यादी आज काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल नाथ यांच्यासह अन्य दिग्गज उमेदवारांचा या यादीच समावेश आहे.
त्यासोबतच अजयसिंह राहू यांना सीधी मतदारसंघातून तर अरुण यादव यांना खंडवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारी यादीतील उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.