शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ शिलेदारांची घोषणा; पहिल्या उमेदवार यादीची ६ ठळक वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 9:01 PM

उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आल्याचं दिसत आहे.

Lok Sabha Election Congress ( Marathi News ) : नवी दिल्ली इथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने ज्या मतदारसंघांचं जागावाटप निश्चित झालं आहे, तेथील उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी काँग्रेसकडून घेण्यात आल्याचं दिसत आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांमध्ये १५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, तर २४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक आहेत. या ३९ उमेदवारांमध्ये १२ उमेदवारांचं वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, तर ८ उमेदवार हे ५० ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. तसंच १२ उमेदवार ६१ ते ७० आणि ७ उमेदवार ७१ ते ७६ वर्षे वयोगटातील आहेत. याबाबत काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील उमेदवारांच्या घोषणेला उशीर का? महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार असून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जागावाटपावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत काँग्रेसकडूनही महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४