येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:56 PM2021-04-01T18:56:57+5:302021-04-01T19:00:21+5:30

कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

congress asked for resignation of cm yediyurappa citing the order of high court of karnataka | येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला

येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला

Next
ठळक मुद्देबीएस येडियुरप्पा यांनी तत्काळ राजीनामा द्यावाकाँग्रेसने केली मागणीउच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला

नवी दिल्ली: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसकडून येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आले आहे. (congress asked for resignation of cm yediyurappa)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. येडियुरप्पा यांच्याविरोधात चौकशीचे निर्देश दिले गेले पाहिजेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यपालांनी येडियुरप्पा यांच्या चौकशीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; पोलीस शहीद

येडियुरप्पा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

राजीव शुक्ला यांनी येडियुरप्पा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे, तो विषय अतिशय गंभीर आहे. येडियुरप्पा यांनी राजीनाम्या दिल्याशिवाय या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. 

येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांनीही येडियुप्पा यांच्यावर टीका केली आहे. ग्रामविकास विभागात मुख्यमंत्री येडियुरप्पा हस्तक्षेप करतात. तसेच भ्रष्टाचार करतात, असा आरोप ईश्वरप्पा यांनी केली आहे. भाजप पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पा यांना हटवले पाहिजे. येडियुरप्पा यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीका ईश्वरप्पा यांनी केली आहे. 

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला

दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकमध्येही येदीयुरप्पा यांच्या उचलबांगडीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यांकडून येडियुरप्पा यांना हटविण्याचाी मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार बसगौंडा पाटील यत्नान यांनी ही मागणी केली असून, राज्यात भाजपला वाचविण्यासाठी आगामी निवडणुकांपूर्वीच बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
 

Web Title: congress asked for resignation of cm yediyurappa citing the order of high court of karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.