नवी दिल्ली- पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाला घेरण्याच्या नादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला 'जी' असं संबोधलं. त्यानंतर भाजपानं हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींवर निशाणा साधला. परंतु आता काँग्रेसनंही भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीनं यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यात मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला रविशंकर प्रसाद 'हाफिजजी' असं म्हणत असल्याचं पाहायला मिळतंय.प्रियंका चतुर्वेदी ट्विटमध्ये लिहितात, मला आशा आहे की भाजपाच्या नव्या वेबसाइटवर या व्हिडीओला योग्य जागा मिळेल. भाजपा नेतृत्वाचंही हाफिज सईदला एक प्रकारे समर्थन होतं. भाजपानंच वेद प्रकाश वैदिक यांना हाफिज सईदची गळाभेट घेण्यासाठी पाठवलं होतं. तर प्रियंका यांनी दुसऱ्या एका शेअर केलेल्या फोटोमध्येही अजित डोवाल मसूद अझहरला सोडायला जात असतानाचं चित्र दाखवलं आहे.
राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:19 AM