- शीलेश शर्मानवी दिल्ली : चीनी सैन्य परत जात असल्याच्या वृत्ताचे स्वागत करत काँग्रेसने घुसखोरीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, गलवान खोऱ्यातून चीनच्या सैनिकांच्या माघारीचे वृत्त भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारे आहे. पण, पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, कोणीही आमच्या भूभागावर कब्जा केलेला नाही. चीनी सैनिक जर भारतीय सीमेच्या आत नव्हते तर मग परत कोठून जात आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका अहवालाच्या आधारे मोदी सरकारवर निशाणा साधला आणि सांगितले की, कोरोना, नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत सरकार कसे अपयशी ठरले. काँग्रेस पक्ष एकटाच दररोज या मुद्यावरुन मोदी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, दुसरे विरोधी पक्ष शांत आहेत. एकीकडे मायावती सरकारच्या सूरात सूर मिसळत आहेत. तर, डावे पक्ष कधीतरी काही वक्तव्य करुन सरकारवर टीका करण्याची औपचारिकता पूर्ण करत आहेत.भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर काँग्रेसने प्रश्नांचा भडीमार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे की, सैन्याच्या कर्मचाऱ्यांचे ११ हजार कोटी रुपये कपात करुन भाजप सरकार त्यांना प्रोत्साहित करत आहे काय?
मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल; पण विरोधक शांतच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 4:19 AM