पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसचा मोठा हल्ला, महाभारतातील दृष्य दाखवत शेअर केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:53 PM2023-06-14T13:53:20+5:302023-06-14T13:54:49+5:30
मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत, त्यात पंतप्रधान मोदींना कलंक म्हटले आहे.
लोकसभा निवडणुका जस-जशा जवळ येत आहेत, तस-तसे राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. या बाबतीत भाजप आणि काँग्रेस आघाडीवर आहेत. आता काँग्रेसने नव्यानेच केलेल्या निशाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत, त्यात पंतप्रधान मोदींना कलंक म्हटले आहे.
व्हिडिओत काय? -
'हे कथा संग्राम की, विश्व के कल्याण की', या नावाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसने बीआर चोपरा यांच्या महाभारत मालिकेतील व्हिजुअल्स दिले आहेत. यानंतर, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून ते महात्मा गांधी, नाथूराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर यांचे फोटोही टाकले आहेत.
यात महात्मा गांधींचा फोटो येतो, तेव्हा व्हाइसओव्हरमध्ये 'धर्म' एकायला येते, गोडसेचा फोटो येतो तेव्हा 'अधर्म', सरदार पटेलांचा येतो, तेव्हा 'आदी', भगत सिंगांचा येतो तेव्हा 'अनंत', नेहरूचा येतो तेव्हा 'सत्य' आणि सावरकरांचा येतो तेव्हा 'असत्य' एकायला येते. यानंतर, लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेचा फोटो येतो तेव्हा 'कलेश' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येतो तेव्हा 'कलंक' असे शब्द ऐकायला येत आहेत.
है कथा संग्राम की, विश्व के कल्याण की pic.twitter.com/XnskkpnCTr
— Congress (@INCIndia) June 14, 2023
हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी लिहिले, "केवळ इतिहासच नाही, तर दोन प्रकारच्या विचार धारांचा ऐतिहासिक संघर्ष आणि त्या संघर्षाचे ऐतिहासिक परिणामही या सुंदर व्हिडिओमध्ये दिसत आहेत."