शीलेश शर्मा नवी दिल्ली : वॉल स्ट्रीट जनरलमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा राजकीय वापरावरून प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हल्ले करत आहेत. काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे तर भाजपचा आरोप आहे की, काँग्रेसने केंब्रिज एनलिट्काचा उपयोग केला होता आणि आता मात्र आमच्यावर आरोप करत आहे.फेसबुकनेदेखील आरोप फेटाळून लावताना म्हटले की, आम्ही राजकीय पक्ष किंवा नेता पाहून निर्णय घेत नाही. त्याच्या दुसऱ्या एका अधिकाºयाने खुलासा केला की, फेसबुक भारतात व्यापारावर प्रतिकूल परिणामाच्या भीतीमुळे कोणतीही कारवाई करण्यास घाबरतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन जवळ येत असताना या मुद्यावर तिखट हल्ले सुरू केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी फेसबुक आणि भाजपवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘हे आमची लोकशाही कमकुवत व लोकशाहीची मुळे दुबळी करण्याचे प्रकरण आहे. या प्रकरणामुळे लोकांना संभ्रमित केले आहे. हे असे प्रकरण आहे की, आज हजारों-लाखों युवक फेसबुक युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत आहेत. ते त्यांचा धडा शिकत नाहीत. चुकीचे-वाईट फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर सांगणाºया लोकांना ते आज कोट करत आहेत. सत्य प्रमाणित करत आहेत. म्हणून जेपीसीकडून चौकशी होणे गरजेचे आहे. यात काही विरोधाभास मला दिसत नाही.’’
कोण काय म्हणाले?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले होते की,‘‘भाजप -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवतात. या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून मतदारांना चिथावणी देतात.’’ राहुल यांच्या या टष्ट्वीटवर दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर देताना म्हटले की, ज्यांचा खोटारडेपणा पकडला गेला तेच आरोप करीत आहेत.