नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे राष्ट्रीय संकट हाताळण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी’ (एनडीआरएफ) हा वैधानिक निधी असूनही मोदी सरकारने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या ‘पीएम केअर्स’ या धर्मादाय ट्रस्टच्या कायदेशीरपणाला ‘क्लीन चिट’ देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी दिल्यानंतर त्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी जुंपली.काँग्रेसने आणि खास करून राहुल गांधी यांनी ‘पीएम केअर्स’वर सडकून टिका केली असली तरी आज या पक्षाने सत्ताधाऱ्यांना मोकळे रान दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला. हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लोकशाहीमध्ये सत्ताधारी हे ‘बादशहा’ नसतात तर ते मतदार जनतेला उत्तरदायी असतात या संकल्पनेच्या दृष्टीने आजचा दिवस दु:खाचा आहे. ‘स्वच्छ सूर्यप्रकाश हेच सर्वोत्तम जंतुनाशक असते’, असे एरवी आग्रहपूर्वक सांगणाºया सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च बनविलेल्या संदिग्ध आणि संशयास्पद नियमांनुसार काम करणाºया ‘पीएम केअर्स’ला जाब विचारण्याची नामी संधी न्यायालयाने गमावली आहे.सुरजेवाला यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सरकारच्या वतीने मंत्री रविशंकर प्रसाद व भाजपाच्या वतीन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा मैदानात उतरले व त्यांनी ‘पीएम केअर्स’चे जोरदार समर्तन करत असतानाच राहुल गांधींना टिकेचे लक्ष्य केले.कोविड-१९ विरुद्धचा लढा जिंकण्याचा राष्ट्रीय निर्धार दुबळा करण्याची एकही संधी राहुल गांधी यांनी सोडलेली नाही, अशी बोचरी टिका करताना प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींनी ‘पीए केअर्स’ बद्दल जे जे आक्षेप घेतले होते ते सर्व न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. सर्वकायदेशीर बाबींची पूर्तता आणि लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांचा सदुपयोगी विनियोग या दोन्ही बाबतीत या ट्रस्टचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. या निधीचा अपहार किंवा दुरुपयोग केल्याचा एकही आरोप कोणी कधी केलेला नाही. याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ सरकारच्या काळात ‘एनडीआरएफ’ निधीतून राजीव गांधी फौंडेशन या खासगी ट्रस्टला पैसे दिले गेले होते, या जुन्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.भाजपा पक्षाध्यक्ष नड्डा यांनी याच रोखाने टिका करताना राहुल गांधींनीच न्यायालयात ‘भाडोत्री पक्षकार’ उभे केल्याचाही अप्रत्यक्ष आरोप केला. ते म्हणाले की, न्यायालयाचा निकाल ही राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूला सणसणीत चपराक आहे. कुचकटपणे कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे स्वच्छ सूर्यप्रकासारखे जगापुढे येतेच. आता तरी ही विघ्नसंतोषी मंडळी तोंड गप्प ठेवून स्वत:ची आणि आपल्या पक्षाची आणखी नाचक्की करून घेणार नाहीत, अशी कुत्सित अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.>प्रसाद यांनी दिलेला हिशेबहे शरसंधान करीत असतानाच मंत्री प्रसाद यांनी ‘पीएम केअर्स’मधील निधी व त्याचा विनियोग याचा हिशेब दिला तो असा :
सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काँग्रेस-भाजपची जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:22 AM