'है कथा संग्राम की, स्वार्थ की परमार्थ की...' महाभारताच्या गाण्यातून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:44 PM2023-06-14T13:44:14+5:302023-06-14T13:44:58+5:30
महाभारताचे गाणे लावून गांधी-नेहरुंच्या काँग्रेसपासून आजच्या काँग्रेसपर्यंतचा प्रवास व्हिडिओत दाखवला आहे.
Congress BJP: 'है कथा संग्राम की, विश्व के कल्याण की, धर्म अधर्म, आदि अनंत, सत्य असत्य, क्लेश कलंक स्वार्थ की कथा परमार्थ की, शक्ति है भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का ये संपूर्ण सार है… नवीन महाभारताचे हे थीम सॉन्ग सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाईलच्या रिंग टोनपासून ते कॉलर टोनपर्यंत, अनेकांनी या गाण्याला सेट केले आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द महाभारताची कथा सांगतो. यातच आता काँग्रेस नेते या गाण्यापासून बनलेला एक व्हिडीओ शेअर करत आहेत.
व्हिडिओच्या बॅकग्राउंडला महाभारताचे हे गाणे असून गांधी-नेहरुंच्या काँग्रेसपासून ते आजच्या काँग्रेसपर्यंतचा प्रवास या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. एवढंच नाही तर या व्हिडिओतून काँग्रेस आणि भाजपमधील वैचारिक लढाईदेखील दाखवण्यात आली आहे. या गाण्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मनमोहन सिंग, नथुराम गोडसे, वीर सावरकर, पीएम मोदी आणि अमित शहांचाही उल्लेख आहे. गाण्यातील प्रत्येक शब्दाला वेगळा फोटो लावला आहे.
व्हिडिओत काय...?
ना केवल इतिहास, बल्कि दो तरह की विचारधाराओं का ऐतिहासिक संघर्ष व उस संघर्ष के ऐतिहासिक परिणाम भी इस ख़ूबसूरत वीडियो में देखने को मिलते हैं.. https://t.co/Xiu2sjNfW0
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) June 14, 2023
गाण्याची सुरुवात बीआर चोप्रांच्या महाभारतातील एका दृश्याने होते. यात शिखरावर पांडवांसह भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. दुसऱ्या फोटोत द्रौपदीचे अपहरण आणि तिसऱ्यात धृतराष्ट्र, दुर्योधन आणि इतर भाऊ पितामह भीष्मांसोबत उभे आहेत. पुढच्या फोटोत वासुदेवाचे विशाल रूप दाखवण्यात येते. यानंतर राजकीय महाभारत सुरू होते. यानंतर राजकीय फोटो सुरु होतात.
गाण्याचे बोल आणि नेत्याचा फोटो
गाण्यात जिथे धर्माचे किंवा सत्याचे नाव येते, तिथे गांधींचा फोटो दाखवलाय, तर अधर्म किंवा असत्याचा उल्लेख आहे, तिथे नथुराम गोडसेसह इतर भाजप नेत्यांचे फोटो आहेत. काँग्रेसने गाण्यातून भाजपच्या विचारधारेवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.