संसदेत उपस्थित राहा! काँग्रेस, भाजपाचा खासदारांना व्हीप...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:04 PM2019-02-04T17:04:30+5:302019-02-04T17:05:45+5:30
सीबीआय- प. बंगाल सरकार वाद आणि नागरिक सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हे व्हीप बजावण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उद्यापासून पुढील तीन दिवस उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसनंतरभाजपाने खासदारांना व्हीप जारी केला आहे. सीबीआय- प. बंगाल सरकार वाद आणि नागरिक सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हे व्हीप बजावण्यात आले आहेत.
BJP has also issued whip for its Lok Sabha MPs, asking them to be present in the House on February 5 and 7. #BudgetSessionhttps://t.co/pk8ttG7RnQ
— ANI (@ANI) February 4, 2019
काँग्रेसने लोकसभेच्या खासदारांना पुढील 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे. यानंतर लगेचच भाजपानेही राज्यसभा खासदारांना 5 ते 8 फेब्रुवारी आणि लोकसभेच्या खासदारांना 5 ते 7 फेब्रुवारी याकाळात लेकसभेच्या सभागृहांत उपस्थित राहण्यास बजावले आहे.
लोकसभेमधील काँग्रेसचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदारांना हा व्हीप जारी केला आहे.