Congress BJP Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका सभेत बोलताना काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची (Congress Manifesto) तुलना मुस्लीम लीगशी केली होती. त्यावरुन आता काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणाले होते पीएम मोदी?पंतप्रधान मोदींनी 6 एप्रिल रोजी राजस्थानच्या अजमेर येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली होती. 'काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप आहे. आज काँग्रेसकडे ना तत्त्वे आहेत, ना धोरणे आहेत. जणू काही काँग्रेसने सर्व काही कंत्राटावर देऊन संपूर्ण पक्षाला आउटसोर्स केले आहे,' अशी टीका पीएम मोदींनी केली होती.
काँग्रेसचा पलटवारकाँग्रेसने पंतप्रधानांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, लोकसभा निवडणुकीत भाजप 180 जागांचा आकडा पार करणार नाही. या भीतीनेच ते पुन्हा हिंदू-मुस्लिम करत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले की, त्यांच्या वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता.