सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 06:25 AM2020-09-23T06:25:43+5:302020-09-23T06:26:02+5:30

संसदेबाहेर ‘गांधीगिरी’ : उपसभापतींनी चहा-नाश्ता आणला; पण, निलंबित सदस्यांनी नाकारला

Congress boycotts work in lok sabha, rajya sabha till suspension of members is lifted | सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

Next

विकास झाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रविवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. ज्यांच्यासमोर हा गोंधळ झाला ते उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे गांधीगिरी करीत या सदस्यांसाठी चहा-नाश्ता घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले; पण, आठही सदस्यांनी तो नाकारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी देशभरात आंदोलन करणार आणि निलंबन मागे होईपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची घोषणा कॉँग्रेसने केली.


रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला होता. या वेळी उपसभापतींसमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन, डेरेक ओब्रायन, दोला सेन, संजय सिंह, के. के. रागेश, इल्लामारम करीम यांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. हे आठही सदस्य सरकारचा निषेध करीत संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. या सर्व सदस्यांनी इथेच रात्र काढली.

निलंबन मागे घेतले जात नाही तोवर
काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार

जोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केले. त्यांनी निलंबित आठ सदस्यांची धरणे स्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.
आझाद म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा माल घेताना तो किमान आधारभूत मुल्यापेक्षा कमी भावात घेतला जाणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी. देशभरात आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवित आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कॉँग्रेसचे राजीव सातव यांनी संसद परिसरातील धरणे आंदोलन थंबविण्यात आले असले तरी देशाच्या रस्त्यास्त्यावर नेऊन सरकार कसे शेतकरी विरोधी आहे ते त्यांना पटवून देऊ, हे आंदोनल आता देशव्यापी केले जाई असे त्यांनी सांगितले.
रिपून बोरा यांनी उपसभापती यांनी आमच्यासाठी चहा आणून जशी सह्दयता दाखवली तशीच संसदेत चर्चा करून निलंबन मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.


माफी मागा, निलंबन मागे घेऊ!
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी त्यांच्या कृतीबाबत माफी मागीतली तर त्यांच्या निलंबनाबाबत विचार केला जाऊ शकतो असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केली.

हरसिमरत कौर यांचे राष्ट्रपतींना पत्र
एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाºया हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विट करीत लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आलेली ही कृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला कायद्याचं स्वरुप प्राप्त होईल.
 

Web Title: Congress boycotts work in lok sabha, rajya sabha till suspension of members is lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.