काँग्रेसने निशिकांत दुबेंविरोधात उमेदवार बदलला; नवीन यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:00 AM2024-04-22T09:00:14+5:302024-04-22T09:02:25+5:30
lok sabha elections 2024 : काँग्रेसने झारखंडमधील गोड्डामधून दीपिका पांडेय सिंह यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Congress Candidate List: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी (21 एप्रिल) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसने या उमेदवार यादीत आंध्र प्रदेशमधून 9 आणि झारखंडमधून 2 उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने झारखंडमधील गोड्डामधून दीपिका पांडेय सिंह यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रांचीमधून यशस्विनी सहाय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने निशिकांत दुबे यांना तिकीट दिले आहे. या जागेवरून काँग्रेसने दीपिका पांडेय सिंह यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसने दीपिका पांडेय सिंह यांना गोड्डा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, याला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर काँग्रेसने पुन्हा नवा उमेदवार जाहीर केला. तर भाजपाने रांची लोकसभा मतदारसंघातून संजय सेठ यांना उमेदवारी दिली आहे.
Congress releases list of Lok Sabha Candidates for Andhra Pradesh and Jharkhand.
— ANI (@ANI) April 21, 2024
Congress declares Pradeep Yadav as its candidate for Jharkhand's Godda in place of Deepika Singh Pandey pic.twitter.com/vo5VhDhOGV
आंध्र प्रदेशातील काँग्रेस उमेदवार
काँग्रेसने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम मतदारसंघातून पेदादा परमेश्वर राव, विजयनगरममधून बोब्बिली श्रीनू, अमलापुरममधून जंगा गौथम, मछलीपट्टणममधून गोलू कृष्णा, विजयवाडामधून वल्लुरु भार्गव, ओंगोलमधून एडा सुधाकर रेड्डी, नांदयालमधून जंगीती लक्ष्मी नरसिम्हा राव, अनंतपूरमधून मल्लिकार्जुन वज्जला आणि हिंदुपूरमधून समद शाहीन यांना तिकीट देण्यात आले आहे.
देशभरात सात टप्प्यांत मतदान
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत, तर झारखंडमध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसने आंध्र प्रदेशमधील लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या 12 जागांसाठी यादी जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडले. देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 102 जागांवर मतदान झाले आहे. देशभरात सात टप्प्यांत होणाऱ्या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.