Congress Candidate List: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी (21 एप्रिल) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसने या उमेदवार यादीत आंध्र प्रदेशमधून 9 आणि झारखंडमधून 2 उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने झारखंडमधील गोड्डामधून दीपिका पांडेय सिंह यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रांचीमधून यशस्विनी सहाय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने निशिकांत दुबे यांना तिकीट दिले आहे. या जागेवरून काँग्रेसने दीपिका पांडेय सिंह यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसने दीपिका पांडेय सिंह यांना गोड्डा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, याला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर काँग्रेसने पुन्हा नवा उमेदवार जाहीर केला. तर भाजपाने रांची लोकसभा मतदारसंघातून संजय सेठ यांना उमेदवारी दिली आहे.
आंध्र प्रदेशातील काँग्रेस उमेदवारकाँग्रेसने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम मतदारसंघातून पेदादा परमेश्वर राव, विजयनगरममधून बोब्बिली श्रीनू, अमलापुरममधून जंगा गौथम, मछलीपट्टणममधून गोलू कृष्णा, विजयवाडामधून वल्लुरु भार्गव, ओंगोलमधून एडा सुधाकर रेड्डी, नांदयालमधून जंगीती लक्ष्मी नरसिम्हा राव, अनंतपूरमधून मल्लिकार्जुन वज्जला आणि हिंदुपूरमधून समद शाहीन यांना तिकीट देण्यात आले आहे.
देशभरात सात टप्प्यांत मतदानआंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत, तर झारखंडमध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसने आंध्र प्रदेशमधील लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या 12 जागांसाठी यादी जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडले. देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 102 जागांवर मतदान झाले आहे. देशभरात सात टप्प्यांत होणाऱ्या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.