शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही; पंतप्रधान मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 7:49 AM

येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही.

रायपूर : भ्रष्टाचार ही काँग्रेसची सर्वांत मोठी विचारधारा असल्याचे वर्णन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्वांत जुन्या राजकीय पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जर काँग्रेस भ्रष्टाचाराची हमी (गॅरंटी) असेल, तर ते (पंतप्रधान) भ्रष्टाचारावर कारवाईची हमी आहेत. 

येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही. छत्तीसगडमधील घोटाळ्यात बुडालेले काँग्रेस सरकार कुशासनाचे मॉडेल बनले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला बाजूला हटविण्याचे जनतेने ठरविले आहे. इतकेच नाहीतर, पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, जो घाबरतो तो मोदी नाही. हे लोक माझी कबर खोदण्याची भाषा करतात. ते म्हणाले की, छत्तीसगडच्या निर्मितीमध्ये भाजपचा मोठा वाटा आहे. छत्तीसगडच्या विकासासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत.

छत्तीसगडमध्ये १० प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुमारे ७६०० कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. राजधानी रायपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील कांकेर जिल्ह्यातील अंतागड आणि रायपूरदरम्यान नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. 

उत्तर प्रदेशात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा पंतप्रधानांनी गोरखपूर - लखनौ वंदे भारत एक्स्प्रेसला गोरखपूर रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी जोधपूर ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा शुभारंभही मोदींनी केला. 

पंतप्रधान आज तेलंगणातपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वारंगलमध्ये ६१०० कोटी रुपयांच्या अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी प्रसिद्ध भद्रकाली मंदिराला भेट देतील.

मुख्यमंत्री बघेल यांची टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही आलात आणि खोट्याचे वारे वाहू लागले. जर तुमच्या सरकारची भूमिका राज्यांच्या धान खरेदीत एवढीच असेल, तर तुमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना १००० - १२०० रुपये प्रति क्विंटलने धान विकायला का भाग पाडले जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा