शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:09 PM2023-07-18T20:09:17+5:302023-07-18T20:11:32+5:30

Sharad Pawar NCP And Shiv Sena Thackerya Group: शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एक गट एनडीएसोबत तर दुसरा गट विरोधकांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.

congress chief mallikarjun kharge important statement on sharad pawar and uddhav thackeray about join opposition meeting | शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

googlenewsNext

Sharad Pawar NCP And Shiv Sena Thackerya Group: आताच्या घडीला महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे ४० आमदार व अनेक खासदारांना घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एका वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यावरून विरोधकांच्या बैठकीनंतर प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून २४ विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरू येथे पार पडली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केले. माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत आणि दोन गटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट शब्दांत उत्तर दिले. 

शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे?

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी आहे. मग त्यांना कसे विरोधकांच्या आघाडीत सामावून घेतले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते पक्षाचे नेते आहे. लोकप्रिय आहेत. त्यांना कार्यकर्ते आणि नागरिकांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा लोकप्रिय नेते आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत. आमदार येतील किंवा जातील ते महत्त्वाचे नाही. पक्ष निर्माते इथे आहेत. दोघे पक्ष निर्माते आहेत. ते फायटर आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. आम्ही एक आहोत. आमच्यात डिवीजन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, देशातील विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. आता दुसरी दोन दिवसीय बैठक बंगळूरु येथे पार पडली. विरोधकांच्या बैठकीला पहिल्या दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्या दिवशी उपस्थित राहिले नव्हते. शरद पवार दुसऱ्या दिवशी बैठकीवेळी उपस्थित राहिले. 

 

Web Title: congress chief mallikarjun kharge important statement on sharad pawar and uddhav thackeray about join opposition meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.