सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग अयोध्येला जाणार? सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने पाठवले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:27 AM2023-12-21T08:27:40+5:302023-12-21T08:29:56+5:30

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आमंत्रित केले आहे.

congress chief mallikarjun kharge sonia gandhi get invitations for ram temple consecration ceremony | सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग अयोध्येला जाणार? सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने पाठवले निमंत्रण

सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग अयोध्येला जाणार? सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने पाठवले निमंत्रण

Ram Mandir ( Marathi News ) : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. हा कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख म्हणून असतील. ते प्राण-प्रतिष्ठेची पूजा करतील. खरगे आणि सोनिया गांधी यांच्याशिवाय लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनाही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सहभागी होणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही. 

शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य; गुन्हेगारीशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि चौधरी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही निमंत्रण मिळाले आहे. ट्रस्टशी संबंधित लोकांच्या शिष्टमंडळाने निमंत्रण दिले आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे. 

ट्रस्टने म्हटले आहे की, विविध परंपरेतील पूज्य संत तसेच प्रत्येक क्षेत्रात देशाच्या सन्मानासाठी योगदान देणाऱ्या सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. नवीन तीर्थक्षेत्रपुरममध्ये एक तंबू शहर उभारण्यात आले आहे ज्यात सहा कूपनलिका, सहा स्वयंपाकघर आणि दहा खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात देशभरातील सुमारे १५० डॉक्टरांनी रोटेशन पद्धतीने सेवा देण्याचे मान्य केले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध पंथातील सुमारे चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.

Web Title: congress chief mallikarjun kharge sonia gandhi get invitations for ram temple consecration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.