आज संपूर्ण देशात मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहेत. तेही या देशाचे नागरिक आहेत. त्यांनाही समान अधिकार आहेत. एवढेच नाही, तर दुर्बल घटकांतील लोक आज अत्याचाराचे बळी ठरत आहेत. विशेषतः दलितांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणत, आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
महागाईच्या मुद्यावर काय म्हणाल्या सोनिया गांधी? -यावेळी सोनिया गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, नोटाबंदीनंतर, देशातील अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत चालली आहे. लोक बेरेजगार होत आहेत. यावेळी सोनिया यांनी यूपीए सरकारच्या काळातील कामांचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, यूपीए-2 ने देशाच्या जनतेला फूड सिक्योरिटी आणि माहितीच्या अधिकाराचा कायदा दिला आहे. एवढेच नाही, तर आम्ही गरगुती सयंपाकाचा गॅस, पेट्रेल आणि डिझेलचे दर नियंत्रित केले होते. मात्र, आपण पाहत आहात, की आज महागाई सातत्याने वढताना दिसत आहे.
यावेळी, सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला. सध्या महात्मा गांधींची हत्या करणारांचे उदात्तीकरण केले जात आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
सरकारच्या खासगीकरण धोरणावर सोनियांचा प्रहार -मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे.