Congress Chintan Shivir: राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतनशिबिर सुरू आहे. यात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस विशेष योजना आखत आहे. यासाठी राहुल गांधी यांनीदेखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील एक वर्षात राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी असा यात्रा करणार आहेत. यातील बराच प्रवास पायी चालत असेल. ही यात्रा देशातील तळागळाल्या लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी असेल.
संसदीय मंडळ स्थापन करण्याची मागणीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G23 नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या स्थापनेची मागणी केली आहे. दरम्यान, आज(रविवारी) उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा तिसरा आणि शेवटचा दिवस. या चिंतन शिबिरात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत.
संघटना मजबूत करण्यासाठी विचारमंथनकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, प्रदेश युनिट अध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत चिंतन शिबिरात आतापर्यंत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटना मजबूत करण्यासाठी विचारमंथन झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.