काँग्रेसचे कमबॅक : छत्तीसगडमधील सर्व 10 महानगरपालिकांमध्ये सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:15 PM2020-01-11T16:15:27+5:302020-01-11T16:15:56+5:30
राज्यातील सर्व 10 महानगर पालिकांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. यापैकी जगदलपूर, अंबिकापूर आणि चिरमिरीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. तर रायपूर, बिलासपूर, दूर्ग, राजनांदगाव, रायगड, धमतरी, आणि कोरबा महापालिकेत काँग्रेसने मित्रपक्षांसोबत सत्ता मिळवली.
नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने शानदार पुनरागमन केले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 10 महानगर पालिकांच्या महापौरपदी काँग्रेसचे उमेदवार विराजमान झाले आहेत. यामुळे काँग्रेस नेत्यांचा उत्साह वाढला आहे.
छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात 10 महानगरपालिका, 38 नगरपालिका आणि 103 नगरपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. सत्ताधारी काँग्रेस राज्यातील सर्व महानगर पालिकांमध्ये सत्तेत येण्यास यशस्वी झाले. राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील 151 नगरपरिषदांमध्ये 2843 वार्डांसाठी मतदान घेण्यात आले होते. यापैकी 1283 वर्डांत काँग्रेसला आणि भाजपला 1131 वार्डात विजय मिळाला.
राज्यातील सर्व 10 महानगर पालिकांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. यापैकी जगदलपूर, अंबिकापूर आणि चिरमिरीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. तर रायपूर, बिलासपूर, दूर्ग, राजनांदगाव, रायगड, धमतरी, आणि कोरबा महापालिकेत काँग्रेसने मित्रपक्षांसोबत सत्ता मिळवली. यामध्ये कोरबा सोडल्यास सर्व महापालिकांमध्ये काँग्रेसचे अधिक उमेदवार विजयी झाले आहेत.