शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आघाडी व संयुक्त प्रचाराबाबत काँग्रेस संभ्रमात

By admin | Published: January 15, 2017 12:53 AM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करावयाचा पक्षाचा जाहीरनामा, लढविण्यात येणाऱ्या जागांची नेमकी संख्या आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपासोबत

- व्यंकटेश केसरी,  नवी दिल्लीउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करावयाचा पक्षाचा जाहीरनामा, लढविण्यात येणाऱ्या जागांची नेमकी संख्या आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपासोबत आघाडी केल्यानंतर संयुक्तरीत्या प्रचार कसा करायचा, या मुद्यांवरून काँग्रेस पक्ष अद्यापही संभ्रमात आहे.‘आम्ही १०३ जागा मागितल्या आहेत. परंतु ८० ते ८८ जागा मिळतील अशी आशा आहे. या मुद्यावर राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेच निर्णय घेतील,’ असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी अतिशय जवळीक असलेल्या अ. भा. काँग्रेस कमिटीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक जाहीरनामा जारी करणार काय, असे विचारले असता, ‘याबाबत खुद्द निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्षच अंधारात आहेत,’ अशी माहिती या पदाधिकाऱ्याने दिली. पक्षाच्या कार्यक्रमावर मत मागणार की अखिलेश सरकारच्या कामगिरीवर, या एका प्रश्नाच्या उत्तरात हा पदाधिकारी म्हणाला, याबाबतही अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. सपातील फुटीमुळे सरकारविरोधी लाट निष्प्रभ ठरेल आणि सपा, काँग्रेस व रालोद यांची महाआघाडी भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा काँग्रेसच्या व्यवस्थापकांना विश्वास आहे’.राज्यात अन्य पक्षांसोबत आघाडी करायची की स्वबळावरच लढायचे, या मुद्यावरून कायम असलेला संभ्रम आणि समाजवादी पार्टीतील कौटुंबिक भांडण यामुळे राज बब्बर यांच्या अध्यक्षतेखालील प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रचार कमिटी आणि अन्य कमिट्या सध्यातरी निष्क्रियच आहेत, असे पक्षाचे तिकीट मिळविण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीत मुक्काम ठोकून असलेल्या उत्तर प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी सांगितले.काँग्रेसला बसपा किंवा सपाशी आघाडी करून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी गुलाम नबी आझाद हे सुरुवातीपासूनच सांगत आले आहेत. परंतु आपला पक्ष स्वबळावरच निवडणुका लढणार हे बसपाप्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे.- उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्यात आघाडी होईल का, काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स आतापासूनच तिथे दिसू लागली आहेत.- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप एकाही उमेदवाराचे नाव निश्चित केलेले नाही. तर अखिलेश यादव यांच्यासाठी आपण माघार घेणार असल्याचे काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी नुकतेच जाहीर केले होते.