तेलंगणात काँग्रेस ९५ जागा लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:54 AM2018-11-02T05:54:57+5:302018-11-02T05:55:19+5:30
काँग्रेस तेलंगणात विधानसभेच्या ९५ जागा लढविणार असून, उर्वरित २४ जागा प्रस्तावित आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत, असे तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी सांगितले.
हैदराबाद : काँग्रेसतेलंगणात विधानसभेच्या ९५ जागा लढविणार असून, उर्वरित २४ जागा प्रस्तावित आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत, असे तेलंगणाचेकाँग्रेसचे प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी सांगितले.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, तेलुगू देसम, तेलंगण जनसमिती आणि भाकपने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पक्ष जागा वाटपाबाबत आपसात चर्चा करीत आहेत. ७ डिसेंबर रोजी तेलंगणात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ९५ पैकी ५७ मतदारसंघांतील उमेदवारांबाबत आम्ही गुरुवारी चर्चा केली. उमेदवारांची पूर्ण यादी ८ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा ९ नोव्हेंबर रोजी घोषित केली जाईल, असे खुंटिया यांनी स्पष्ट केले. तेलंगण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी आणि इतर वरिष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अन्य नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत.