“अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही म्हणून PM मोदींनी सेंट्रल व्हिस्टाला भेट दिली”; काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:52 AM2021-09-28T10:52:15+5:302021-09-28T10:53:08+5:30
पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते.
नवी दिल्ली: अलीकडेच पंतप्रधाननरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशात परतले. अनेकार्थाने पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा विशेष आणि महत्त्वाचा होता. मात्र, यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामधील संसद भवनाच्या कामाला अचानक भेट दिली. पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही, म्हणून पंतप्रधान मोदींनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला भेट दिली, असा चिमटा काढण्यात आला आहे. (congress criticised pm modi over sudden visit to central vista project in delhi)
मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!
काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी. व्ही यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक निशाणा साधला. अमेरिकेत मोदींचे स्वागत झाले नाही, म्हणून दिल्लीतच स्वागत करुन घेतले. व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झाले नाही म्हणून सेंट्रल व्हिस्टावरच काम चालवून घेतले. साहेबांचे जगच वेगळे आहे, असा टोला ट्विट करत लगावण्यात आला.
“BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला
लेपल माइक देखील राहून गेला
चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनीही पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मोदी सेंट्रल व्हिस्टा बांधकाम परिसरात दिसत आहेत. या ट्विटमध्ये विनोद कापरी यांनी म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता भेट दिल्याने मल्टि कॅमेरा शूट होऊ शकले नाही आणि लेपल माइक देखील राहून गेला. देशवासीयांनो सॉरी, असे खोचक ट्विट करण्यात आले आहे.
America में स्वागत नही हुआ,
— Srinivas BV (@srinivasiyc) September 27, 2021
तो दिल्ली Airport पर ही करा लिए,
White House में Photo-Shoot नही हुआ,
तो Central-Vista से ही काम चला लिए...!
साहेब की दुनिया ही अलग है !!!
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या सेंट्रल व्हिस्टाच्या भेटीचे कौतुक केले आहे. विकासाचा ध्यास हाच श्वास! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार हेच सिद्ध केले आहे. अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी सेंट्रल व्हिस्टाची पाहणी करण्यासाठी जाणे अचंबित करणारे आहे. त्यांची ही ऊर्जा आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देते, म्हणूनच मोदीजी आमचे मार्गदर्शक व आदर्श आहेत, असे भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.