नवी दिल्ली:कर्नाटकमध्येऑक्सिजन अभावी २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या चमराजनगर येथील जिल्हा रुग्णालयात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने या घटनेविषयी संताप व्यक्त केला असून, केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय, असा गंभीर आरोप काँग्रेसने यावेळी केला आहे. (congress criticises centre govt over oxygen shortage in karnataka incident)
कर्नाटकातील चमराजनगर शहरातील जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसह २४ जणांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश यांनी दिली. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने एक ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार सातत्याने खोटे बोलत आहे
केंद्र सरकार सातत्याने खोटे बोलत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येने रुग्ण मरत आहेत. आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी सरकार लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, देशात ऑक्सिजनचा अजिबात तुटवडा नाही. उलट गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजनअभावी होत असलेल्या मृत्यूंना जबाबदार कोण आहे?, अशी विचारणा काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
“पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”
कर्नाटकात कोरोनाचा कहर कायम
आतापर्यंत कर्नाटकात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाखच्याही पुढे गेला आहे. येथे रविवारी ३७ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तसेच २१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कालाबुर्गी येथील केबीएन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच यदगीर सरकारी रुग्णालयात लाइट गेल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचाही मृत्यू झाला होता. याशिवाय कर्नाटकातील अनेक रुग्णालयांत गेल्या एक आठवड्यात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाला आहे.
वार्तांकनापासून माध्यमांना थांबवू शकत नाही: सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला चपराक
दरम्यान, कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार माजवला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव जात आहे. आता कर्नाटकातील चामराजनगर येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. सांगण्यात येते, की मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सीजन सप्लाय थांबल्यानंतर ते तडफू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.