"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 08:36 AM2024-07-19T08:36:36+5:302024-07-19T08:42:20+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

Congress criticize PM Modi on the statement of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat | "लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरुन काँग्रेस पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करताना दिसत आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत झारखंडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, स्वतःचा विकास करताना माणसाला सुपरमॅन व्हायचे असते, असं म्हटलं आहे. त्यावरुन आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टोमणा मारत कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्नी क्षेपणास्त्र डागल्याची बातमी मिळाली असावी, असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी आपण बायोलॉजिकल नसून देवाने पाठवलेले आहोत, असं म्हटलं होतं.

झारखंडमधील गुमला येथे ग्रामस्तरीय कार्यकर्ता संवाद कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत बोलत होते. लोकांना माणसातून सुपरमॅन, सुपरमॅनमधून देवता आणि देवातून देव व्हायचे आहे, असं मोहन भागवत म्हणाले. त्यावरूनच मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असल्याचा दावा करत काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केला.

काय म्हणाले मोहन भागवत?

"स्वत:चा विकास केल्यानंतर माणसाला अलौकिक बनायचे असते, सुपरमॅन व्हायचे असते. पण तो एवढ्यावरच थांबत नाही. यानंतर त्याला वाटते की आपण देवता व्हावे, परंतु देवता म्हणतात की आपल्यापेक्षा मोठा देव आहे आणि मग त्याला देव बनायचे असते. देव म्हणतो की तो वैश्विक रूप आहे, म्हणून त्यालाही वैश्विक रूप बनायचे आहे. त्यानंतरही थांबायला जागा आहे की नाही हे कोणालाच माहीत नाही. पण, विकासाला अंत नाही. बाह्य विकास तसेच अंतर्गत विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. नवजातीच्या कल्याणासाठी लोकांनी अथक प्रयत्न केले पाहिजेत, कारण विकास आणि मानवी महत्त्वाकांक्षेला अंत नाही. तसेच कार्यकर्त्याने त्याच्या कामावर कधीच समाधानी नसावे," असं मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवतांच्या भाषणाचा व्हिडिओ रिट्विट करत जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'मला खात्री आहे की स्वयंघोषित बायोलॉजिकल पंतप्रधानांना नागपूर येथून लोक कल्याण मार्गावर डागलेल्या या नवीन अग्नी क्षेपणास्त्राची बातमी नक्कीच मिळाली असेल, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.
 

Web Title: Congress criticize PM Modi on the statement of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.