अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:10 AM2020-01-27T05:10:58+5:302020-01-27T05:15:02+5:30

पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता.

Congress criticizes Adnan Sami for Padma Shri | अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

googlenewsNext

नवी दिल्ली : गायक अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल कॉंग्रेसने रविवारी प्रश्न उपस्थित करून हा पुरस्कार मिळविण्यासाठी भाजपाची चमचेगिरी करणे हा मापदंड झाला असल्याची टीका केली आहे. पार्टीचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी कारगिल युद्धात सामील झालेल्या सैनिक सनाउल्लाहला घुसखोर घोषित का करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला आहे.
पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. शेरगिल यांनी एक व्हिडीओ जारी करून भारतीय सेनेचे शूर शिपाई आणि भारतमातेचे पुत्र मोहम्मद सनाउल्लाह यांनी पाकिस्तानविरुद्ध कारगिलची लढाई लढली. त्यांना एनआरसीच्या माध्यमातून घुसखोर घोषित करण्यात आले. दुसरीकडे अदनान सामीला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्याचे वडील पाकिस्तानच्या वायुसेनेत आॅफिसर होते आणि भारताविरुद्ध गोळीबार केला होता.

Web Title: Congress criticizes Adnan Sami for Padma Shri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.