चीनकडे डोकलामचा मुद्दा न काढल्याबद्दल काँग्रेसची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 01:53 AM2018-07-29T01:53:37+5:302018-07-29T01:54:11+5:30

जोहान्सबर्गमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत डोकलामचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

 Congress criticizes Modi for not taking cognizance of China | चीनकडे डोकलामचा मुद्दा न काढल्याबद्दल काँग्रेसची मोदींवर टीका

चीनकडे डोकलामचा मुद्दा न काढल्याबद्दल काँग्रेसची मोदींवर टीका

Next

नवी दिल्ली : जोहान्सबर्गमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत डोकलामचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हणाले की, पंतप्रधान मोदी चीनच्या राष्ट्रपतींना भेटतात आणि डोकलामवर बोलायचे मात्र विसरूनच जातात.
हे सरकार ५६ इंचाची छाती आणि लाल डोळे दाखवणार तरी कधी? देशाची सुरक्षा आणि सीमा याबाबतचे मुद्दे उपस्थित करण्याचे धाडस कधी दाखविणार? अमेरिकेच्या समितीने म्हटले आहे की, चीन डोकलाममध्ये महामार्ग बनवित आहे. तेथे पायाभूत सुविधा आणि सैन्याची ताकद वाढवित आहे. पण मोदी मात्र तोच विषय काढण्याचे टाळत आहेत.

Web Title:  Congress criticizes Modi for not taking cognizance of China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.