शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमुळेच इतरांचा पराभव, स्थानिक पक्ष का आघाडी करतील? गुलाम नबी आझादांचं मर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 9:01 AM

काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतलाय.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येतील अशीही चर्चा आहे. या सगळ्यात काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अशा कोणत्याही शक्यता नाकारल्या आहेत. याऊलट त्यांनी काँग्रेसवरच टीकास्त्र सोडलं. याशिवाय राहुल गांधींच्या कोर्टात हजेरी लावण्यासाठी सूरतला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही जोरदार टीका केली.

'आझाद' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या आधी 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राशी आझाद यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं. “काँग्रेस पक्षात काहीही बदललं नाही. ज्या ठिकाणी मजबूत स्थानिक नेते आहेत, त्याच राज्यांमध्ये त्यांना विजयाची अपेक्षा आहे. त्यांच्यामुळे पक्षाचा कोणत्या राज्यात विजय होतोय किंवा पराभव होतोय याचा दावा ते करू शकत नाहीत,” असंही ते म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावरही निशाणा साधला.

"काँग्रेसवर संताप"“केंद्रीय नेतृत्वाचा कोणत्याही जागेवर कोणताही प्रभाव नाही. ते ना कोणाला जिंकवू शकत ना कोणाचा पराभव करू शकत. काँग्रेस नेत्यांचा जय-पराजय त्या ठिकाणच्या विद्यमान नेतृत्वावर अवलंबून आहे,” असं म्हणत आझाद यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी त्यांना विरोधकांच्या एकतेवर प्रश्न विचारण्यात आला. “मला वाटत नाही कोणालाही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षा आहे. कोणाला तशी असेलही. परंतु आता प्रत्येक जण तितकंच खा जितकं पचू शकेल असा विचार करतो. भारतासारख्या मोठ्या देशात एक राष्ट्रीय पक्ष बनवणं आणि सोबत येऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं अतिशय कठीण आहे. विरोधक एकत्र येणार नाहीत. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझं हेच म्हणणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"छोटे पक्ष राज्यातच आनंदी"विरोधकांची एकजूट व्हावी अशी माझी इच्छा आहे, पण गेल्या ४०-५० वर्षांत मी जवळपास प्रत्येक राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांना ओळखतो. मी बहुतेक वेळा त्यांच्याशी आघाडीवर चर्चा केली आहे. मी म्हणू शकतो की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या राज्यात आनंदी आहे. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर गेल्यास आपला पराभव होईल. राज्यात त्यांचं लक्ष कमी झाल्यास दुसरा कब्जा करेल, असं त्यांना वाटत असल्याचं आझाद म्हणाले.“काँग्रेसमुळेच पराभव”“पश्चिम बंगालमध्ये जर आघाडी झाली तर त्या ठिकाणी काँग्रेसकडे काय आहे? एकही जागा नाही. काँग्रेस टीएमसीला कसा फायदा करून देईल? ममता बॅनर्जी ४२ पैकी ५-१० जागा काँग्रेसला का देईल. आघाडी त्याच ठिकाणी होते जिकडे मत घेण्याची क्षमता असते. हे सध्या अशक्य आहे. काही ठिकाणी तर काँग्रेसमुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षांचा पराभव झालाय अशी परिस्थिती आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद