अब की बार, काँग्रेस सरकार; मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:24 AM2018-12-12T11:24:48+5:302018-12-12T11:30:14+5:30
मध्य प्रदेशात काँग्रेसनं जनतेचा विश्वास संपादन केलं आहे.
भोपाळ- मध्य प्रदेशात काँग्रेसनं जनतेचा विश्वास संपादन केलं आहे. जनतेनं काँग्रेसला भरभरून मतं दिल्यानं काँग्रेसच्या कधी नव्हे ते 114 जागा निवडून आल्या आहेत. त्यातच मध्य प्रदेश राज्यात काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केल्यानं त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावलं असून, काँग्रेस या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
काँग्रेस नेत्यांनी काल रात्रीच आनंदीबेन पटेल यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसारच मध्य प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दुपारी 12 वाजता भेटण्याची वेळ दिली आहे. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश असणार आहे.
Congress delegation to meet Madhya Pradesh Governor at 12 noon to stake claim to form govt. #AssemblyElectionResults2018pic.twitter.com/b1IgLj3guN
— ANI (@ANI) December 12, 2018
मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे.