शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या कार्यशैलीवर जाहीररीत्या हल्ले व टीका करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा मूड नेतृत्वाचा नाही, असे संकेत सोमवारी पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी दिले. उल्लेखनीय हे आहे की, गेल्या एक आठवड्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम आणि गुलामनबी आझाद यांनी कठोर टीका करून पंचतारांकित संस्कृतीचा उल्लेख करून तळापासून वरपर्यंत निवडणूक घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आझाद यांना विचारले गेले की, ते १९९८ पासून २०१७ पर्यंत नियुक्त झालेले होते. तरीही आज निवडणुकीची मागणी का करीत आहात? तेव्हा तुम्ही निवडणूक घेऊन पदे भरण्याचा आग्रह का धरला नाही? आझाद यांच्याकडे याचे थेट उत्तर नव्हते; परंतु त्यांनी नरसिंह राव यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून युक्तिवाद केला की, १९९२ मध्ये मीच संघटनेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे तिरुपती अधिवेशनात निवडणूक घेतली गेली. ‘लोकमत’ने जेव्हा वरिष्ठ नेत्यांकडे या वादाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रुप २३ च्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, वादाचे मूळ राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे नेतृत्व नाही. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांच्याबद्दल तक्रार नाही, तर सल्लागारांबद्दल आहे. या सल्लागारांना राजकारण समजत नाही.
ज्येष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये हवा सहभागया नेत्यांचा इशारा के. राजू, रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपालसारखे नेते पक्ष चालवत आहेत, याकडे होता. त्यांना पंचतारांकित हॉटेलसह विलासाची संसाधने हवीत. आनंद शर्मा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर सही केल्यानंतर मौन आहेत; परंतु अनौपचारिक चर्चेत ते मोकळे बोलतात.
वरिष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये आपला सहभाग असे वाटते. याच कारणामुळे टीका करणारे नेते सामूहिक नेतृत्वाचा विषय काढतात. त्यांची ही मागणी आहे की, संसदीय बोर्डाची स्थापना आणि कार्य समिती सदस्यांची निवडणूक झाल्यास वाद संपेल.