सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी; चार समित्या देण्याची केंद्राची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:48 AM2024-09-11T06:48:17+5:302024-09-11T06:48:49+5:30

जूनमध्ये सभापतिपदासाठी निवडणूक झाली होती. तेव्हापासून काँग्रेसने उपसभापतिपदाची मागणी लावून धरली आहे. 

Congress demanded six standing committees; Center readiness to provide four committees | सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी; चार समित्या देण्याची केंद्राची तयारी

सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी; चार समित्या देण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली - संसदेच्या स्थायी समित्यांपैकी ६ समित्यांचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे, तर केंद्र सरकारने यापैकी चार समित्यांचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली. 

सरकारप सत्तेवर आल्यानंतर २४ स्थायी समित्यांपैकी एकाही समितीचे पक्षनिहाय वाटप अद्याप झालेले नाही. काँग्रेसने संरक्षण, अर्थसह चार समित्यांचे अध्यक्षपद मागितले आहे.

लवकरच घोषणा

लवकरच या समित्यांची घोषणा केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या संख्याबळाच्या आधारे समित्यांमध्ये स्थान दिले जात आहे. काँग्रेसने यापूर्वी लोकसभेचे उपसभापतिपद मागितले होते. जूनमध्ये सभापतिपदासाठी निवडणूक झाली होती. तेव्हापासून काँग्रेसने उपसभापतिपदाची मागणी लावून धरली आहे. 

Web Title: Congress demanded six standing committees; Center readiness to provide four committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.