- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधामुळे काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोतविरोधात त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारले होते. त्यावेळी पायलट यांची भाजपशी जवळीक निर्माण झाली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपचा त्याग करून काही काळाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
सिद्धू २००९ साली लोकसभेचे सदस्य बनले. मात्र, त्यांना २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर सिद्धू यांना भाजपने राज्यसभेवर पाठविले होते. सचिन पायलट व नवज्योतसिंग यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. मात्र, तरीही अशोक गेहलोत, अमरिंदरसिंग या दोन काँग्रेस मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठी दुखावू इच्छित नाहीत. या दोन मुख्यमंत्र्यांची गांधी घराणे व काँग्रेसवरील निष्ठा वादातीत आहे, तसेच राजस्थान व पंजाबमध्ये दोन वर्षांनी विधानसभा निवडणुकाही आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेसमध्ये चिंतन आणि मंथम सुरू आहे. सध्या, सचिन पायलट मौन आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे आणि नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.
पंजाबमधील वाद 10 दिवसांत मार्गी लागतो. मज राजस्थानमध्ये 10 महिने होऊनही मार्ग का सापडत नाही? असा सवाल पायलट समर्थक आमदार करत आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह यांनीही म्हटले आहे, की पायलट यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हायला हवी. यासंदर्भात एकीकडे काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. तर दुसरीकडे पायलट यांच्या घरी काल बैठ झाली.