काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची घोषणा केली आहे. या समितीत १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.
... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं
समितीत यांचा समावेश आहे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री, एन. उत्तम कुमार रेड्डी, टी.एस. सिंग देव, केजे जिओग्रे, प्रीतम सिंग, मोहम्मद जावेद, अमी याज्ञिक, पीएल पुनिया, ओंकार मरकम, केसी वेणुगोपाल यांची नावे आहेत.
निवडणूक काळात या समितीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. कारण निवडणुकीसाठी कुणाला तिकीट द्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय हीच समिती घेत असते. याशिवया निवडणुकीशी संबंधित इतर कामांतही या समितीची भूमिका महत्वाची मानली जाते.
काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, एकीकडे पक्षाने निवडणूक समितीची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोर आपली दोन महत्त्वाची राज्ये वाचविण्याचे आव्हान आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभा निवडणूक ही दोन प्रमुख पक्षांमध्ये (भाजप-काँग्रेस) सेमीफायनलसारखी आहे, तिथून सार्वत्रिक निवडणुकीत जनतेचा मूड समजेल.
सध्या देशात वन नेशन, वन इलेक्शन हा चर्चेचा विषय बनला आहे. सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली असून, वन नेशन, वन इलेक्शनची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा डाव आहे, अशी अटकळ बांधली जात आहे.